
कोपरगाव प्रतिनीधी
(नाशिक):- महाराणा प्रताप यांच्या ४८२ व्या जयंतीच्या निमित्ताने क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील मुलांना फळांचे व किराणामालाचे वाटप करत अन्नदान करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना महाराणा प्रताप यांचा गौरवशाली इतिहासाबाबत माहिती देत त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.
यावेळी क्षत्रिय समाज फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत, सचिव सरवनसिंग शेखावत, रामसिंग राजपूत, दिलीप देवांग, बलबीरसिंग शेखावत, महेंद्रसिंग राजपूत, संदीप चंद, तेजपाल सिंह, अनिल कौशिक, गिरवारसिंग राठौड, जसवंत सिंह चौहान उपस्थित होते.
