
कोपरगांव प्रतिनीधी:-
महाराष्ट्र राज्याचे धुरंधर नेतृत्व आणि संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी १९७२ ते १९८५ आणि १९९० ते २००४ याकाळात विधानसभा सदस्यत्वाबरोबरच कृषि फलोत्पादन, सहकार, महसुल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, नागरी कमाल जमिन धारणा मंत्रीपदासह हंगामी सभापती म्हणून उल्लेखनीय कारकिर्द केली असल्यांने त्यांचा कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या आवारात पुर्णाकृती पुतळा उभारून हे शक्तीस्थळ सर्वांना प्रेरणा देणारे ठरावे असे प्रतिपादन बाबासाहेब दहे यांनी केले.
तालुक्यातील डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांना माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा म्हणून सरपंच शोभा मच्छिंद्र माळी, उपसरपंच दत्तात्रय किसनराव दहे यांच्या हस्ते ठरावासह निवेदन देण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी सर्वश्री. भाउसाहेब दहे, एकनाथ बढे, धर्मा दहे, अमोल होन, धर्मा गणपत दहे, जालींदर दहे. माजी सरपंच एकनाथ माळी, बबनराव माळी, ग्रामपंचायत सदस्य अंकुश गायकवाड, बापूराव बढे, शिवाजीराव बढ़े आदि उपस्थित होते.
श्री. बाबासाहेब दहे पुढे म्हणाले की, कोपरगांव शहरासह ग्रामिण भागाच्या विकासात माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सात दशके योगदान देत येथील प्रत्येक रहिवासियांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. संजीवनी उद्योग समुहाबरोबरच त्यांनी व्यक्तीगत लाभाच्या योजनासह सार्वजनिक हिताची असंख्य कामे केली. त्यांच्या निधनामुळे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व लोप पावले. तरुणपिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुर्णाकृती पुतळा कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या आवारात असावा असे ते म्हणाले. शेवटी ग्रामसेवक महेश काळे यांनी आभार मानले.
