विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी उपक्रम एक स्तुत्य उपक्रम असून या हा उपक्रम राबविल्याबद्दल मी के. जे. सोमैया महाविद्यालय आणि त्यांच्या या अभियानाचे अभिनंदन करतो…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी उपक्रम एक स्तुत्य उपक्रम असून या हा उपक्रम राबविल्याबद्दल मी के. जे. सोमैया महाविद्यालय आणि त्यांच्या या अभियानाचे अभिनंदन करतो. भविष्यात देखील अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षाही व्यक्त करतो,” अशा भावना चांदेकसारे गावचे जेष्ठ नेते केशवराव होन यांनी व्यक्त केल्या. ते के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या उन्नत भारत अभियान, गुणवत्ता हमी कक्ष व लायन्स क्लब कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मायक्रो ऑरगॅनिझम दिनाच्या निमित्ताने मायक्रोबायोलॉजी विभागाच्या वतीने प्राथमिक शाळेतील रक्तगट तपासणी शिबिराप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सुधीर डागा हे होते. याप्रसंगी चांदेकसारे गावच्या सरपंच खरात मॅडम, घारीचे सरपंच जाधव साहेब, डाऊच बुद्रुकच्या सरपंच माळी मॅडम, डाऊच खुर्द चे सरपंच संजुबाबा गुरसळ व देर्डे कोऱ्हाळे गावाचे सरपंच देशमुख साहेब यांनीही अशाच भावना व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. सुधीर डागा म्हणाले की “या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल मी जे सोमय्या महाविद्यालयाच्या उन्नत भारत अभियान, मायक्रोबायोलॉजी विभाग व लायन्स क्लब कोपरगाव यांचे विशेष अभिनंदन करतो.” “विद्यार्थ्यांना बालवयातच स्वच्छतेबद्दल जागृत केल्यास ते भविष्यात देशालाही स्वच्छ करतील आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणा बद्दल प्रेम आणि आस्था निर्माण होईल. भारताची भावी पिढी स्वच्छता व आरोग्य हा मंत्र घरोघरी पोहोचवून स्वच्छ भारत ही ओळख जगात निर्माण करेल” असेही श्री. डागा म्हणाले.
उपरोक्त पाचही गावच्या प्राथमिक शाळातील एकूण सातशे विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासून त्यांना कार्ड देण्यात आले तपासणी कार्य सोमैया महाविद्यालयाच्या एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी च्या विद्यार्थ्यांनी केले पोस्टर्स व मॉडेलचे सादरीकरण बी. एस्सी. च्या विद्यार्थ्यांनी केले तसेच स्वच्छतेवरील पथनाट्याचे सादरीकरण एम. एस्सी. च्या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सामाजिक उपक्रमात उपरोक्त सर्व शाळांचे सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनीही सक्रिय सहभाग घेतला. या पाचही गावातील उपक्रमांसाठी समता इंटरनॅशनल स्कूल व त्यांच्या कार्यकारी संचालिका मा. स्वातीताई कोयटे मा. संदीपजी कोयटे यांचे बहुमोल सहकार्य लाभले महाविद्यालयाने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी सोमैया महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध आजार व स्वच्छतेचे संदेश देणारे पोस्टर्स मॉडेल्स व पथनाट्य यांचे सुबक सादरीकरण करण्यात आले शिबिराचे उद्घाटन 21 सप्टेंबर रोजी चांदे कसारे येथे झाले. याप्रसंगी सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी मायक्रोबायोलॉजी विभागातील प्राध्यापक व आयोजकांचे कौतुक करत उपक्रमाला शुभेच्छाही दिल्या. सोमैया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. के. एल. गिरमकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ठाणगे व्ही. सी . उन्नत भारत अभियानाचे समन्वयक डॉ. शैलेंद्र बनसोडे डॉ. बी. एस. गायकवाड कोपरगाव लायन्स क्लब चे अध्यक्ष परेश उदावंत, लियो क्लब चे अध्यक्ष सुमित सिंनगर उपस्थित होते. मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख प्रा. आकाश पवार, प्रा. योगेश चौधरी, प्रा. मिलता वंजारे, प्रा. प्रज्ञा कडू, प्रा. उर्मिला अहिरे, प्रा. जागृती पाटील व प्रा. ऋषिकेश जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम संपन्न झाला.
हा उपक्रम घडवून आणण्याबद्दल को.ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व सचिव ऍड संजीव दादा कुलकर्णी यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. हा उपक्रम घडवून आणण्यासाठी को.ता. एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीप रोहमारे यांनी उन्नत भारत अभियान व मायक्रोबायोलॉजी विभागाला प्रोत्साहन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *