कोपरगावच्या शिरपेचात डॉ मयुरी आव्हाड-वाघ महाराष्ट्र मेडीक्वीनच्या निवडीने मानाचा तुरा:- स्नेहलताताई कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
राष्ट्रीय आयूर्वेदाचार्य कोपरगांवचे डॉ. रामदास आव्हाड यांनी उत्तुंग भरारी घेत नांवलौकीक मिळविला असून आता त्यांच्या कन्या डॉ. मयुरी आव्हाड वाघ यांना नुकताच महाराष्ट्र मेडीक्वीनचा मानाचा किताब मिळाल्याने कोपरगांवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मिळाला असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
मेडीक्वीन मेडीको पॅजेंटच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. प्रेरणा बेरी व सचिव डॉ. प्राजक्ता शाह यांनी वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्यभरातील विवाहीत महिलांसाठी पुणे येथे ही स्पर्धा भरविली होती. त्यात २०० वैद्यकिय महिलांनी सहभाग घेतला होता. कोपरगांवची कन्या व नाशिकच्या प्रसिध्द स्त्री आयुर्वेद वैद्य डॉ. मयुरी आव्हाड-वाघ यांनी या स्पर्धेत भाग घेत पहिल्या दहा स्पर्धकांत स्थान मिळवून महाराष्ट्र मेडीक्वीन ग्लॅमरस व स्टायलिश वुमन हा मानाचा किताब पटकावला त्याबददल त्यांचा सौ. कोल्हे यांनी सत्कार केला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोरोना महामारीनंतर आता राज्यात बहुतांष ठिकाणी जीवन पुर्वपदावर आले असुन नेतृत्वगुणांतील कसब दाखविण्यांच्या स्पर्धाही सुरू झाल्या. त्यात कोपरगांवचे राष्ट्रीय आयूर्वेदाचार्य डॉ रामदास आव्हाड यांच्या मुलींने सहभाग घेत कोपरगांवचा नांव लौकीक उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. मयुरी आव्हाड वाघ हया आयूर्वेद शास्त्रात निपुण असुन त्यांनी वंचितांचे दुःख हरण करण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महाराष्ट्र मेडीक्वीन किताबाने त्यांची जबाबदारी वाढली असुन आयूर्वेदाच्या माध्यमातुन या भूतलावरील रूग्णांचे दुःख हरण करण्यासाठी त्यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करून याहीपेक्षा मोठा नांवलौकीक मिळवावा असेही त्या शेवटी म्हणाल्या. या स्पर्धेचे परिक्षण अभिनेते समिर धर्माधिकारी, अभिनेत्री पुजा सावंत, डॉ. रेवती राणे, डॉ. उज्वला बर्दापुरकर यांनी केले.

फोटोओळी:-कोपरगांव
कोपरगांवच्या कन्या डॉ. मयुरी आव्हाड-वाघ यांना नुकताच महाराष्ट्र मेडीक्वीन मानाचा किताब मिळाल्यांबददल त्यांचा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *