बक्तरपुर सोसायटीच्या अध्यक्षपदी साहेबराव सानप तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सानप यांची निवड…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील बक्तरपुर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे साहेबराव कारभारी सानप तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब आनंदा सानप यांची निवड झाली त्याबददल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. गांगुर्डे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा बक्तरपुर गांवच्यावतीने सत्कार करण्यांत आला. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच संजय बोडखे होते.
याप्रसंगी संचालक सर्वश्री अलका बोडखे, अशोक सानप, अलका वसंतराव सानप, रेखा सानप, काशिनाथ बोडखे, संदिप उगले, संदिप सानप आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष साहेबराव सानप म्हणाले की, बक्तरपुर सोसायटीच्या सर्व सभासद शेतक-यांना विश्वासात घेवुन कामकाज करू व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली बँक पातळीवरील सर्व योजनांची अंमलबजावणी करू. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने बक्तरपुर गावचे विकासासाठी सहकार्य केले आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी सर्वश्री. के. के. सानप, संतोष सानप, अरूण उगले, सुभाष सानप, साहेबराव बोडखे, शंकर सानप, पुंजा सानप, सुकदेव सानप, वाळीबा सानप, छबु सानप, दगु नागरे, रमेश बोडखे, बाजीराव सानप, शांताराम सानप, नाना पायमोडे, रामभाउ सानप, सोमनाथ सानप, दिनेश सानप, गणेश नागरे, गणेश बुरकूल, गौरव सानप, वसंत सानप, रमेश गरूड, उध्दव बोडखे, महेश सानप, विजय सानप, सुनिल सानप, नारायण नागरे, वैभव सानप आदि उपस्थित होते. शेवटी सचिव श्री. गुजर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *