कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- अनेक दिग्गज आमदार असतांना देखील मतदार संघाच्या विकासासाठी पैसे आणण्याची कला ना. आशुतोष काळे यांनी चांगली अवगत केली आहे. त्यामुळे आजपर्यंत कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात अडीच वर्षाच्या काळात कोणत्याही आमदाराला एवढा निधी मिळाला आला नाही त्यापेक्षा जास्त निधी आमदार आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी आणला असून एवढा मोठा निधी आणणारा ना.आशुतोष काळेंसारखा आमदार होणे नाही असे गौरवद्गार ज्येष्ठ उद्योजक कैलास ठोळे यांनी काढले आहे.
कोपरगाव शहरातील नागरिकांचा अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने ना. आशुतोष काळे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ना. आशुतोष काळे यांच्याकडे असलेल्या नेतृत्व गुणांमुळे आणि शरदचंद्रजी पवारसाहेब आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या विश्वासाची मोठी शिदोरी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची एवढ्या कमी वयात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यात जे काही मोजकेच साखर कारखाने कर्जमुक्त आणि प्रगतीपथावर आहेत त्या कारखान्यांपैकी एक कारखाना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना असून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याचा सर्व कारभार हायटेक असून त्याचे श्रेय हे ना. आशुतोष काळे यांचे आहे. एकेकाळी बाहेरून ऊस आणणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आपला ऊस दुसऱ्या कारखान्यांना देत आहे. कारण मागील दोन वर्षात कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून वेळेवर मिळणाऱ्या आवर्तनामुळे हे सर्व शक्य झाले असून कोपरगाव तालुक्याला ठिबक सिंचनसाठी मिळणारी ५० टक्के सबसिडी ना.आशुतोष काळे यांनी ८० टक्के करून आणली त्यामुळे देखील ऊसाचे क्षेत्र वाढले आहे.
ना. आशुतोष काळेंनी मागील अनेक वर्षापासूनचा कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचबरोबर १५० कोटी शिर्डी विमानतळासाठी आणले आहे. तीर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी देखील ३ कोटी १९ लाख ८८ हजार निधी आणला आहे यामागे त्यांची दूरदृष्टी आहे. शिर्डीला येणारे भाविक कोपरगावला येवून कोपरगावचे अर्थकारण वाढले जावे हा त्यामागे उद्देश आहे. कित्येक वर्षापासून सडत पडलेला न्यायालयाच्या इमारतीसाठी देखील ३८ कोटी रुपये निधी मंजूर करून आणले व प्रत्यक्षात काम देखील सुरु झाले आहे. ज्यावेळी सेन्ट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर कोपरगाव येथे आले त्यावेळी शेतमाल निर्यातीबाबतचे अनेक प्रश्न ना. आशुतोष काळे यांनी लेखी स्वरुपात त्यांच्यापुढे मांडले. त्या सर्व प्रश्नाची बारकाईने चौकशी करून व माहिती घेवून सेन्ट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी बहुतांश प्रश्न मंजूर देखील केले आहेत. त्यामुळे मनमाड रेल्वे जंक्शणच्या सेक्टरमध्ये कोपरगाव रेल्वे स्टेशन नंबर एकचे स्टेशन झाले आहे त्याचे श्रेय देखील ना. आशुतोष काळे यांनाच जाते. अशा प्रकारे मतदार संघाचा सर्वांगीण विकस करण्यासाठी एवढ्या कमी कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत एवढा मोठा निधी ना. आशुतोष काळे यांनी आणला आहे त्यामुळे ना.आशुतोष काळें सारखा आमदार होणे नाही असे गौरवद्गार त्यांनी काढले.

फोटो ओळ:- ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कोपरगाव करांच्या वतीने आयोजित करण्यात ना. आशुतोष काळे यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभात आपले मनोगत व्यक्त करतांना ज्येष्ठ उद्योजक कैलास ठोळे.
