पुर्व भागाचा वाली हरपला:- रावसाहेब जाधव…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांना समृध्द शेतक-याबरोबर जिरायती भागातील शेतक-याबददल कमालीची आपुलकी होती, त्यांचे प्रश्न ते पोटतिडकीने सोडवित त्यांच्या निधनाने पुर्व भागाचा वाली हरपला, असा लाखाचा पोशिंदा पुन्हा होणे नाही अशा शब्दात कासली सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी श्रध्दांजली वाहिली.
तालुक्यातील कासली येथे संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबददल सर्वपक्षीय शोकसभा घेण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
कै. शंकरराव कोल्हे यांना कासलीचे सरपंच बाळू आहेर, दादासाहेब सुंबे, शिवाजीराव भगुरे, मल्हारी मलिक, गोविंदराव मलिक, बाबासाहेब सुंबे, डॉ कृष्णा मलिक, भगवान सुंबे, अशोकराव सुंबे, रामभाउ मलिक, गंगाधर साळुंके, आसाराम मांडुडे, भास्करराव सुंबे, विष्णु सुंबे, राजेंद्र नवले, रामदास मलिक, इंद्रभान मलिक, पोपटराव कोटमे आदिंनी श्रध्दांजली वाहिली.
श्री. रावसाहेब जाधव पुढे म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांच्याबरोबरच त्यांच्या पुढील पिढींने पुर्व भागाच्या समस्या सोडविण्यासाठी जीवाचे रान केलेले आहे. त्यांनी या भागात शेततळी, दगडी साठवण बंधारे, मातीचे बंधारे बांधुन जलसमृध्दी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोळनदीला पालखेड मधून जनावरांच्या पिण्यासाठी नेहमी पाणी सोडा म्हणून आग्रह असणारे नेतृत्व पुर्व भागाने गमावले आहे. शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या ९३ व्या वर्षापर्यंत पूर्व भागातील रंजल्या गांजलेल्यांची सेवा केली त्यांचा दुवा त्यांना निश्चित मिळणार असुन सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वप्नांची पुर्ती करण्यासाठीं एकसंघ रहावे असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *