
कोपरगांव प्रतिनिधी:-
पुणतांबा न. २ सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे सुधाकर नारायण जाधव यांची तर उपाध्यक्षपदी अशोक दत्तात्रय धनवटे यांची बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबददल त्यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर जाधव म्हणाले की, कै. शंकरराव कोल्हे यांनी संपुर्ण आयूष्यभर अहमदनगर जिल्हयाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात योगदान देत शेतीच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर येत संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने आपण एका मार्गदर्शक नेतृत्वास मुकलो आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य दिनकर नाना भोरकडे, साहेबराव बनकर, बाळासाहेब पेटकर, अशोक चव्हाण, रावसाहेब थोरात, भाउसाहेब जेजुरकर, विमलबाई धनवटे, मधुकर जगदाळे, दादा सांबारे, बाळासाहेब पेटकर सर, बाबासाहेब पेटकर, सर्जेराव जाधव, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, प्रशांत राउत, संभाजी गमे, बाळासाहेब जाधव गजेंद्र जाधव भीमा धनवटे आदी उपस्थित होते.
