

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील क्रीडा भवनात दि. 19-20 सप्टेंबर, 2024 रोजी आंतरमहाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन दि. 19 सप्टेंबर, 2024 रोजी होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महात्मा फुले कृृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या हॉलीबॉल स्पर्धेसाठी 37 कृषि महाविद्यालयातील मुलांचे 35 संघ व मुलींचे 22 संघ सहभागी होणार आहे. यामध्ये 55 शिक्षकांसह 420 मुले तर 260 मुली सहभागी होणार आहेत.
