बहुचर्चीत कोपरगांव शहराच्या पाणीयोजनेस प्रशासकिय मंजुरी कधी मिळणार:- राजेश मंटाला…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहराच्या पाणीप्रश्ना विषयी अनेक सर्वसामान्य नागरीकांच्या प्रयत्नांमुळे व जन आंदोलनामुळे तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार
नगर विकास मंत्रालयाच्या पडताळणी समितीने 123 कोटींच्या पाणी योजनेस दि.3/1/2022 मंजुरी दिली आहे . त्यावेळेस स्वतः आमदार साहेब व शहराच्या सर्वसामान्य नागरीकांच्या वतिने मी हजर होतो .
त्यानंतर फाईल नगर विकास मंत्रालयाने अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी पुढे पाठवली आहे .
दोन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप प्रशासकिय मंजुरी मिळालेली नाही .
योजनेला प्रशासकीय मंजुरी कधी मिळणार आणी प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार या बाबत नागरीकांकडून विचारणा होत आहे .
आमदार साहेब तसेच संबंधित जबाबदार अधिकारी यांनी याबाबत स्पष्टीकरण देऊन नागरिकांना या बाबत माहिती द्यावी ….
राजेश मंटाला व सर्व सहकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *