
कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
विधवा महिलांच्या मुलांसाठी बालसंगोपनची एका मुलाची रुपये ११२५ वरून २५०० झाली आहे. दोन मुलांना लाभ मिळणार म्हणजे ५००० रुपये प्रत्येक महिन्याला विधवा भगिनींच्या मुलांना मिळणार आहेत.
विधवा महिलांच्या रोजगारासाठी योजना सरकारने जाहीर करावी या कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती चे वतीने राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी सर यांच्या सततच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत विधवांसाठी पंडित रमाबाई यांची आठवण ठेवत त्यांच्या नावाने स्वतंत्र रोजगार योजना जाहीर करण्यात आली आहे.. विधवा महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी याचा नक्कीच उपयोग होणार आहे..
एकल महिलांच्या प्रश्नावर महिला बालविकास मंत्री नामदार यशोमती ठाकूर व राज्य मंत्री ना. बच्चूभाऊ कडू यांनी या मागणीसाठी विशेष पातपूरावा केला. त्याबद्दल नामदार यशोमती ठाकूर व ना. बच्चूभाऊ कडू यांचेसह अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे या दोन घोषणांबाबत मनःपूर्वक आभार…
आप्पासाहेब ढुस,
प्रशांत कराळे,
राहुरी तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती .
