
कोपरगाव प्रतिनिधी:-
त्यांनी येसगाव येथील साठवण तलावातील मासे पकडण्याचा ठेका प्रतिवर्षी 1 लाख 6 हजार रुपयांना दिला, तोच ठेका विजयराव वहाडणे तुम्ही प्रतिवर्षी 14 लाख 14 रुपयांना दिला. 5 वर्षात त्यांनी नगरपरिषदेचे किमान 60 ते 70 लाख रुपये उत्पन्न बुडविले- ते लाखो रुपये कुणी वाटून घेतले असणार हे जनतेला समजते. तुम्ही या ठेक्यात तडजोड केली असती तर तुम्ही कर्जमुक्त झाला असता. विजयराव तुम्हाला व्यवहार कळत नाही. यानंतर तुम्ही सातभाई यांना उत्तर देऊ नका, कारण त्यांचे ईतके तुम्ही महान नाही. त्यांच्या नादी लागून त्यांचे अनेक सहकारी बरबाद झाले. काहीजण बँकेचे टेंशन-कोर्टकचेऱ्यामूळे आजारी पडून गेले. 24 तास सोबत असणारे आत्महत्या करून गेले. समता पतसंस्था, ज्योती पतसंस्था राज्य पातळीवर नावाजल्या. सातभाई पतसंस्था व बँक मात्र गायब झाल्या. वहाडणे कर्जबाजारी आहेत, ते कर्ज नक्की फेडतीलच.
माजी आमदार 2014 च्या मोदी लाटेत 30 हजार मतांनी निवडून आल्या होत्या. 2020 च्या निवडणुकीत त्या निसटत्या मतांनी पराभूत झाल्या यात समाधान मानू नका. 2014 चे 30 हजार मतांचे लीड का कमी झाले? हे सांगा. काहींची संशयास्पद भूमिका असल्यानेच प्रभाग 5 मध्ये भाजपाला कमी मते मिळून पराभव झाला असावा.
यानंतर वहाडणे यांनी कुणालाही उत्तर देण्यात वेळ घालवू नये. कारण नगराध्यक्ष वहाडणे यांना काही कुटिल शक्ती आरोप प्रत्यारोपात अडकवून ठेवतील. त्यांनी फक्त शहरविकासालाच वेळ द्यावा. बँक-पतसंस्था-नगरपरिषद हातात नसल्याने ते पूर्ण मोकळे आहेत. तुमच्यावर आरोप करणारे व त्यांचे कर्तृत्व, पराक्रम जनतेला माहित आहेत. नगराध्यक्षपद -आमदारपद गेले, तसे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीतही होणार. श्री.विजयराव वहाडणे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, आरोप करणारे कुणाचे गुलाम हे सर्वांना माहित आहे.
प्रा.सुभाष शिंदे
भाजपा,माजी शहराध्यक्ष,
कोपरगाव.
