
कोपरगाव प्रतिनिधी:-
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे डॉ.नानासाहेब यांच्या जन्म शताब्दी निमित्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय,शहर पोलिस ठाणे,ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

दिनांक 1 मार्च मंगळवार रोजी डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठानच्या ५० पेक्षा अधिक सदस्यांनी सकाळी ७:३० वाजता कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाचा संपूर्ण परिसर,शहर पोलीस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय आदी प्रमुख ठिकाणी प्रत्यक्ष श्रमदान करून शेकडो क्विंटल कचरा गोळा केला. गोळा झालेला कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवाभावी समाजाभिमुख उपक्रम राबविणारे
प्रतिष्ठान आहे.ही स्वच्छता मोहीम ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ राज्यपालांनी नियुक्त केलेले राज्याचे स्वच्छतादूत तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.

तहसील कार्यालय,ग्रामीण रुग्णालय,शहर पोलीस स्टेशन आदी ठिकाणी कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे, नगर अध्यक्ष विजय वाढणे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर फुलसौंदर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, शेवाळे,कॉन्स्टेबल काकडे, तमनर,मासाळ,सचिन अनर्थे,सुधीर कदम, पालिका कर्मचारी अमोल जगताप,आशिष शिंदे आदींनी उपस्थित राहून अभियानात सहभागी झाले. सदर उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
