कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
२६ फेब्रुवारीला माझा वाढदिवस नरेंद्र मोदी विचार मंच व भाजपा वसंत स्मृती कार्यालयाच्यावतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. स्व.सूर्यभानजी वहाडणे यांचे जुने सहकारी कार्यकर्ते व स्व. सुशिलताई वहाडणे यांचे त्याकाळातील (१९६६) विद्यार्थी श्री. कुतुबुद्दीनभाई अत्तार (श्री.टल्ल्यामामू) यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे जनसंघ, जनता पार्टी, भाजपाचे काम केले. ते आता वयानुसार थकलेले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही जिकिरीचे झालेले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची करवसुली मोहिम सुरूअसल्याने घरपट्टी-पाणीपट्टी भरणेही गरजेचे आहे. कारण जप्तीची नोटिसही आलेली आहे. आर्थिक अडचण असल्याने श्री. अत्तार मला येऊन भेटले. त्यांची बिकट परिस्थिती मी सहकारी मित्रांना सांगीतली. नगरपरिषदेच्या वसुलीच्या कामात हस्तक्षेप न करता आम्ही सर्वांनी मिळून श्री. कुतुबुद्दीनभाई अत्तार यांचेकडे असलेली नगरपरिषदेची थकबाकी रू.३०,००० + शास्ती भरण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाला दिलासा दिला.


वाढदिवसानिमित्त ऐका प्रामाणिक-गरजू कार्यकर्त्याला माणूस म्हणून सहाय्य करण्याचा, आधार देण्याचा उपक्रम करण्यात आला, यातच कार्यकर्ते समाधानी आहेत. यानिमित्ताने मी असेही आवाहन करतो कि, नागरिक तर नगरपरिषदेला सहकार्य करताहेतच, पण नगरपरिषदेच्या सर्व माजी नगराध्यक्ष, सर्व माजी नगरसेवक यांनी स्वतःकडे थकबाकी असेल तर ती त्वरित जमा करावी व कुठलाही हस्तक्षेप न करता प्रभागातील नागरिकांनाही कर भरण्यास सांगावे. त्यामुळेच शहरातील विकासकामे वेगाने करणे शक्य- होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *