
कोपरगाव प्रतिनिधी:-
के.जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक ओझोन दिन”साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने विद्यार्थ्यामध्ये ओझोनक्षया संदर्भात जनजागृती करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. “पृथ्वीवरील ओझोन आवरण वाचवण्यासाठी तरुण विद्यार्थ्यानीं पुढे आले पाहिजे, स्थानिक पातळीवरील संसाधनांचा विवेकी वापर करून अतीआरामदायी जीवन पद्धतीचा त्याग करून आपल्या गरजांवर मर्यादा घातल्या पाहिजे त्याच बरोबर ओझोनचा ऱ्हास थांबवण्यासाठी तरुणाईने निसर्गपूरक जीवनशैली स्वीकारावी ” असे आवाहन त्यांनी प्रा .चेतराज शर्मा यांनी केले. प्रा, शर्मा हे नरबहादूर भंडारी शासकीय महाविद्यालय, गंगटोक सिक्कीम येथे कार्यरत आहेत.ते पुढे असे म्हणाले कि ” माता वसुंधरेच्या संरक्षणाची जबाबदारी तरुण विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे व ती जबाबदारी ते सक्षमपणे पेलवतील मात्र यासाठी “थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली” असे धोरण स्वीकारले पाहिजे.
या व्याख्यानाला एकूण 56 विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. या व्याख्यानांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. वसुदेव साळुंके यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.गणेश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे, डॉ.संतोष पगारे, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे व भूगोल विभागाचे प्रा. आकाश सोनवणे, प्रा. लीना त्रिभुवन, प्रा. कुणाल शिंदे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व सचिव अँड. संजीव कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.
