
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भविष्यात उग्र स्वरूप धारण करणार असून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा म्हणून उभारलेल्या “लढा पाण्याचा – कोपरगाव च्या जनतेचा” या पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या लढ्यात प्रत्येक घरातून योगदान द्यावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्या साठी डिजिटल आंदोलन उभारले असून आज या बाबत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी श्री मंटाला यांची भेट घेऊन या लढ्याची माहिती घेतली
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आहे या पूर्वी सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी कोपरगाव नगरपालिकेने शहरा तील नागरिकांना रेशनकार्ड वर पिण्याचे पाणी दिले होते त्याबाबत बीबीसी या जागतिक वृत्त वहिनीने या प्रश्नांची दखल घेतली होती मात्र एवढा मोठा व गंभीर विषय असताना देखील आज पर्यंत या विषयाची सोडवणुकी साठी कोणत्याच ठोस उपाय योजना अंमलात आणल्या गेल्या नाहीत या वर्षी विक्रमी पाऊस झाला गोदावरी नदी अनेक महिने दुथडी भरून वाहून गेले महाराष्ट्रातील धरणे शंभर टक्के भरली असे असताना देखील कोपरगाव शहरातील नागरिक तहानलेले आहेत आजही नागरिकांना आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे यापूर्वी उच्चांकी २१ दिवसांनी पाणी मिळत होते मात्र राजकीय अनास्थे बरोबरच कोपरगाव शहरातील नागरिकांची सहनशीलता देखील या प्रश्नास तेव्हढीच जबाबदार असून हा प्रश्न राजकीय नेते त्यांच्या राजकीय फायद्या साठी भिजत ठेवत असले तरी जनता मात्र कोरडी पडली आहे
सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी या प्रश्नाचे भविष्यातील संकट ओळखून डिजिटल आंदोलन उभे केले असून मेल करून प्रशासनाला हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करावयाची आहे
पाणी प्रश्न हा शहरा तील प्रत्येक नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून अनेकांकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत दि २४/१/२०२१ पासून या लढ्यात फक्त एक मेल करून सहभागी व्हावे व घराघरातून आपले योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.
या वेळी राजेश मंटाला अधिवासी संघटनेचे अमित आगलावे यांनी सदर लढ्याचे माहिती व माहिती पत्रक दिले.
