
कोपरगाव प्रतिनिधी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोपरगावच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शहरात क्रांतिकारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीला सुरुवात झाली रविदास महाराजांच्या नामाचा जयघोष करत पालखीचे समाज मंदिरात आगमन झाले तदनंतर साई कथाकार ह. भ. प .विकास महाराज गायकवाड यांचे रविदास महाराज यांचे जीवनावरील प्रवचन झाले
माघ पौर्णिमेला झालेल्या या कार्यक्रमात अण्णासाहेब कानडे व संजय कानडे यांचे हस्ते सपत्नीक पुजन करण्यात आले सर्व समाज बांधवांनी दर्शन पुजन व आरती करुन महाप्रसाद घेतला
यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे,श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ,संजीवनी कारखान्याचे व्हाईस चेअरमन दवंगे ,शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराजे ठाकरे, रावसाहेब थोरात,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडीयाल ,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णु पाडेकर,रोहीत वाकचौरे, रमेश गवळी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे आदींनी मनोगत व्यक्त केले वसंतराव थोरात यांनी प्रास्तविक केले तर सूत्रसंचालन संजय दुशिंग यांनी केले
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीपराव
कानडे,महिला राज्य कार्य सदस्या सौ, स्नेहाताई दिलीप कानडे,वसंतराव थोरात, संजय सरवार,संतोष शिंदे,भैया कानडे, तालुका कार्यध्यक्ष अँड रमेश दुशिंग यांनी पाहुण्यांचा यावेळी सत्कार केला
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी माधव पोटे सर, युवा जिल्हा संघटक पदी संजय सरवार, शहर उपाध्यक्ष पदी संतोष दळवी यांची नियुक्ती बद्दल व मेहता कन्या विद्यालयाच्या आदर्श मुख्यध्यापिका सौ मंजुषा सुरवसे मॅडम यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सह सर्व उपस्थित पाहुण्यांना शाल, श्रीफळ, हार देऊन चर्मकार समाज्याच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी नगरसेवक भा ज पा गटनेते मा रविंद्र पाठक, जालिंदर लगड,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे, रोहीत वाकचौरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल गांगुले,राजेंद्र वाकचौरे, नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे, डॉ अनिरुद्ध काळे, वाल्मिक लहिरे,राज्यकार्यनी सदस्य एम डी कानडे,माजी तहसीलदार डी आर दुशिंग,देविदास कानडे, जिल्हा सचिव संजय पोटे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग , शहर अध्यक्ष गणेश कानडे, संजय कानडे, मगर सर , संकेत कानडे,, वसंत थोरात, विकास थोरात, कैलास सातपुते,कृष्णा सातपुते, बाळासाहेब बारसे, गोरख कानडे, पै.बाळासाहेब वानखेडकर ,पै साईनाथ जाधव, संतोष दळवी, संतोष बारसे, कैलास बोरावके,ह भ प नवनाथ महाराज,आंबेडकरसर,भाऊसाहेब कानडे, सुभाष पोटे, संतोष कानडे, सागर पोटे, सुशांत कानडे, अनिल कानडे, गोरख कडू, किसनराव कानडे, योगेश बारसे, दिपक कांबळे, सौ. जयश्री कानडे,सौ उज्वला कानडे, सौ.सरवार,सौ. शिवानी कानडे, सौ. गिरजा कानडे,सौ दुशिंग आदी समाज बांधव व महीला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते
