

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घेत आहेत. या उपचारांनी ना. आशुतोष काळे लवकरात लवकर बरे होवून जनसेवेसाठी पुन्हा सक्रीय व्हावेत यासाठी कोपरगाव शहरासह विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते देवदेवतांना साकडे घालत आहेत.
ना. आशुतोष काळे उपचार घेत आहेत. कार्यकर्ते त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असून कोपरगाव शहरात राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरातील ग्रामदैवत मुंबादेवीची महाआरती केली, तसेच महादेव मंदिरात आरती करून प्रार्थना करण्यात आली. तसेच कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील असंख्य भक्तांचे स्थान असलेल्या उक्कडगाव येथील श्री रेणुकामातेची कार्यकर्त्यांनी महाआरती करून ना. आशुतोष काळे यांची कोरोना बाधेतून मुक्तता होवून त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रार्थना केली. यावेळी बबनराव गाढे, नानासाहेब निकम,आप्पासाहेब निकम, दिपक चव्हाण, हिरामण गुंजाळ, संदीप निकम, सोपान शिंदे, दादासाहेब त्रिभुवन, रविंद्र निकम, शिवाजी निकम, नवनाथ निकम आदी उपस्थित होते.ना.आशुतोष काळेंच्या आरोग्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी श्रद्धेपोटी आपल्या देवदेवतांना साकडे घालण्यास सुरुवात केली अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जात आहे.
