
कोपरगाव प्रतिनिधी:-
(शिर्डी):-
शिर्डी या श्री साईबांबामुळे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान झालेल्या शहरांमध्ये सर्व सुविधायुक्त असे भव्यदिव्य शिर्डीचे पोलीस उपविभागीय कार्यालय, शिर्डी पोलीस स्टेशन तसेच पोलीस निवासस्थान आणि कोपरगाव पोलीस स्टेशनची इमारत कोट्यवधी रुपये खर्च करून अद्यावत अशी बांधण्यात आली आहे .गेल्या सहा महिन्यापूर्वीच या सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले असूनही त्याचे उद्घाटन व लोकार्पण होण्यास उशीर होत आहे . तरी समाजहित लक्षात घेऊन या पोलीस इमारती नागरिकांसाठी लवकरात लवकर खुल्या कराव्यात. यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम अर्ज दाखल करून माननीय न्यायालयाकडे राज्य शासनाला तसे निर्देश द्यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.
असी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की,
शिर्डी व कोपरगाव येथे नवीन पोलीस इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे सहा महिने होत आले. तरी या इमारतींचा उद्घाटन सोहळा झालेला नाही. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले. मात्र शिर्डी पोलीस स्टेशन व कोपरगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन होत नाही. शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे केले जात असल्याचे समजते. मात्र आता निवडणुका झाल्या आहेत. त्याचप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन हे शिर्डी शहरात नसून निमगाव हद्दीत आहे. त्यामुळे आचारसंहितेचा प्रश्न येत नसून त्यामुळे या सर्व कोपरगाव, शिर्डी येथील पोलीस इमारतींचे लवकरात लवकर लोकार्पण व्हावे. उद्घाटन व्हावे, यासाठी यापूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री व इतर मंत्री तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना व संबंधित पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहेत. लवकरात लवकर हे नवीन पोलीस इमारतींचे लोकार्पण करण्याची मागणी केली आहे. मात्र या इमारतीचे लोकार्पण होण्यास दिरंगाई होत आहे. म्हणून निवेदनात दिल्या प्रमाणे आता मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात अंतरिम अर्ज देऊन लवकरात लवकर या पोलीस इमारती लोकार्पण व्हाव्यात. म्हणून मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिले आहे.
