राधाबाई काळे महिला महाविद्यालयात प्रा.डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी
(अहमदनगर):- महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळीतील असामान्य नेतृत्व, वंचित, कष्टकरी, त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारे आपली विचारधारा कायम ठेवून समाजातील उपेक्षित लोकांच्या जीवनाशी समरस होणारे त्यांच्या शिक्षणासाठी व उत्कर्षासाठी झगडणारे आदरणीय कै. एन. डी. पाटील अद्वितीय लोकयोद्धा होते अशाप्रकारची भावना प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी व्यक्त केली.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात प्रा. डॉ. पाटील यांना श्रध्दांजली वाहताना ते बोलत होते. महाविद्यालयात विकास समिती सदस्य, सर्व सेवक वृंद, विद्यार्थिनी व पालकांच्या वतीने कै.एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात येऊन, मौन पाळून स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचे पाईक म्हणून आयुष्यभर शिक्षण प्रसाराचे काम करून रयतच्या माध्यमातून गोरगरिबांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहणारे, शिक्षण क्षेत्रातील नवप्रवाहासाठी मोलाचे योगदान देणारे कै. पाटील हे असामान्य व्यक्तिमत्व होते त्यांच्या जाण्याने रयतचा आधारवड हरपला अशी भावना कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. सतीश शिर्के यांनी त्यांचा थोडक्यात जीवन परिचय सांगून आदरांजली व्यक्त केली. यावेळी उपप्राचार्य प्रा. नासिर सय्यद, प्रा. रामदास बर्वे, प्रा. संभाजी कातोरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *