नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या दिशेने आज पाहिले पाऊल पडले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या दिशेने आज पाहिले पाऊल पडले. हा प्रश्न मार्गी लावणेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय सिस्टमंडळाला दिलेला शब्द पाळला. केंद्रीय सडक परिवहन तथा राजमार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांना पत्र पाठवून या भुयारी मार्गाची डी पी आर मध्ये तरतूद करण्याची मागणी केली आहे..
या बाबत सविस्तर वृत्त असे की, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे आदींनी दि. ३ जानेवारी रोजी खासदार सदाशिव लोखंडे यांची वळद उंबरगाव येथे त्यांचे निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.
नगर मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना धोकादायक अवस्थेत रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते, तसेच तहाराबद श्रीरामपूर रस्ता चौकात रहदारीचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून याठिकाणी अपघातही वाढले असल्याने या दोन्ही ठिकाणी भुयारी मार्ग होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
नगर मनमाड महामार्ग केंद्र सरकारच्या ताब्यात गेला असून त्यासाठी केंद्राने नुकताच निधी मंजूर केल्याने लवकरच या महामार्गाचे काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी या महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथे वरील दोन ठिकाणी भुयारी मार्गाची तरतूद करण्यात यावी म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष बाळासाहेब खांदे, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, साईसेवा निधी संस्थेचे चेअरमन प्रदीप येवले, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे, नगरसेवक आदिनाथ कराळे आदी सर्वपक्षीय नागरिकांची स्वाक्षरी असलेले निवेदन सिस्टमंडळाने शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांना उंबरगाव येथील निवासस्थानी दिले त्या प्रसंगी बोलताना खासदार लोखंडे यांनी या भुयारी मार्गाच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले होते. त्या नुसार खासदार लोखंडे साहेब यांनी केंद्रीय सडक परिवहन तथा राजमार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांना पत्र लिहून आपला शब्द खरा केल्याबद्दल देवळाली प्रवरा येथील सर्व पक्षीय सिस्टमंडळाने खासदार लोखंडे साहेब यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *