जिल्हा परिषद शाळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या खोल्यांमध्येच शिक्षण घ्यावे लागत होते.जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबरच सोयी-सुविधा मिळाव्या या उद्देशातून कोपरगाव तालुक्यातील मोडकळीस आलेल्या अनेक जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्त केल्या. कित्येक गावात नवीन शाळा खोल्यांसाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून शाळा खोल्या बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे
कोपरगाव तालुक्यातील तिळवणी जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे भूमिपूजन व खिर्डी गणेश येथे बांधण्यात आलेल्या दोन जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवण, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्रजी निकोले, सांडूभाई पठाण, राहुल जगधने, सरपंच गोविंद पगारे, वैजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, पुंडलीक चक्के, नानासाहेब गायके, पोपटराव शिंदे, संदीप शिंदे, अशोक वाघ, चंद्रकांत गायके, अण्णासाहेब शिंदे, राजेंद्र गायके, भगवान धुमाळ, सुरेश वाघ, भीमराज गायके, निलेश वाघ, आप्पासाहेब चक्के, रविंद्र चक्के, सुदाम शिंदे, नितीन गायके, गणेश शिंदे, बाळासाहेब गुरव, रविंद्र पगारे, भाऊसाहेब शिंदे, पोपट भूजाडे, साईनाथ गव्हाळे, निलेश वाघ, रामभाऊ खिलारी, प्रविण चौधरी, अखिलेश भाकरे, अशोक भोकरे, सुलतान पटेल, बाबासाहेब शिंदे,नानासाहेब रोहोम, संजयजी लोखंडे, ज्ञानदेवजी रोहोम, वसंतजी लोखंडे, अभिजित चोरगे, मिलिंद लोखंडे, रावसाहेब बावके, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रीतेश वराडे, विक्रम भास्कर, निवास रोहोम, रविंद्र गायकवाड, पांडुरंग वराडे, सरपंच सौ. सरला चांदर, मुख्याध्यापक सोनवणे, मुख्याध्यापक हजारे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी शिक्षणाधिकारी शबाना शेख, शाखा अभियंता लाटे, ग्रामसेवक काटे, ग्रामसेविका जयश्री शेलार, आदी उपस्थित होते.

चौकट :- आ.आशुतोष काळे युवा राजकारण्यांचे आदर्श
आ. आशुतोष काळे यांना जनतेप्रती असलेली तळमळ,सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांच्या व तरुणांच्या प्रश्नांविषयी असलेली जाण व ते प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करतात. राजकारण,समाजकारण करणाऱ्या नेत्यांची मुले परदेशात शिकण्यासाठी गेल्यानंतर परदेशातच रममाण होतात मात्र आ आशुतोष काळे याला अपवाद असून आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी आपल्या जन्मभूमीत परत आले.काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा समर्थपणे चालवत असून जनतेप्रती तळमळ असणारा आमदार अशी त्यांची वेगळी ओळख आहे.आ.आशुतोष काळे यांच्यारूपाने उच्चशिक्षित नेतृत्व कोपरगाव विधानसभा मतदार संघाला लाभलं आहे. सुशिक्षित तरुणाईने राजकारणात यायचं असेल आ.आशुतोष काळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणात यावं.
-प्रशांत शिंदे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, वैजापूर)

फोटो ओळ:-
कोपरगाव तालुक्यातील तिळवणी जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे भूमिपूजन व खिर्डी गणेश येथे बांधण्यात आलेल्या दोन जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे लोकार्पण प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *