
कोपरगाव प्रतिनिधी :- मकर संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नववर्षातील या पहिल्या सणाच्या औचित्य साधत महिला एकत्र येत सण साजरा करत असतात.कोपरगाव शहरातील नरहरी विठ्ठल महाराज मंदिर येथे दि ६ फेब्रुवारी हळदी कंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले असुन याबाबत सविस्तर वृत असे की, कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ या ठिकाणी रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी शहरातील संत नरहरी महाराज मंदिर येथे संध्याकाळी ५:३० ते ८:३० वाजेपर्यंत मकरसंक्रांती निमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई व माजी नगरसेविका पद्मावती योगेश बागुल यांनी दिली आहे.या कार्यक्रमासाठी महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
