दुर्लक्षित लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु नागरिकांच्या समस्या दूर झाल्याचे समाधान:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील काही वर्षापासून दुरावस्था झाल्यामुळे बुद्ध विहारकडे जाणाऱ्या नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करीत होते. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे काम करण्यात आले होते मात्र त्यानंतर आजतागायत या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. या महत्वाच्या रस्त्यासाठी निधी मिळावा अशी बौद्ध समाजबांधवांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार दुर्लक्षित असलेल्या लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होवून या रस्त्याचे काम सुरु होवून नागरिकांच्या समस्या दूर झाल्याचे मोठे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष अकाले यांनी केले.
कोपरगाव शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १४ लक्ष ९० हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परमपूज्य भन्ते कश्यपजी, मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, सुनील मोकळ, दिनकर खरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, सचिन परदेशी, राहुल देवळालीकर, प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे, सौ. माया खरे, अॅड. नितीन पोळ, सुरेश मोकळ, विजय त्रिभुवन, अजय विघे, माधवराव त्रिभुवन, किरण बागुल, रंभाजी रणशूर, रमेश घेगडमल, राजेंद्र पगारे, नानासाहेब रणशूर, शंकर घोडेराव आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:-
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भूमिपूजन आ. आशुतोष काळे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *