रॅपिड टेस्ट किट साठी कैलास शेठ ठोळे व राजेश शेठ ठोळे उद्योग समुहाची आर्थिक मदत..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
शहर व तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असताना रॅपिड टेस्ट किट साठी आमदार आशुतोष दादा काळे यांनी मदत केली डॉ. फुलसुंदर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कैलास शेठ ठोळे, राजेशशेठ ठोळे यांनी सोनापाॅली व ठोळे उद्योग समूहाचे वतीने रुपये ५१,०००ची मदत दिली. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे साहेब, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, वैद्यकीय अधिकारी डॉ.क्रुष्णा फुलसौंदर, कैलास शेठ ठोळे राजेशशेठ ठोळे डॉ. संतोष विधाते, पंचायत समितीचे बिडीओ सचिन सुर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नेहमी सामाजिक सेवाभावी वृत्तीने ठोळे उद्योग समूहाचे वतीने दिलेली हि मदत नक्कीच मोलाची ठरणार आहे समाजाने शासकीय प्रशासकीय आदेशांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *