कोपरगावला प्रती बारामती करण्यासाठी घराघरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे:- जितेन सरडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी: वार्ताहर :- १७ ऑक्टोबर २०१९ च्या साताऱ्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी धो-धो पावसात भाषण केले.ऐतिहासिक ठरलेली हि सभा शेतकऱ्यांच्या बांधापासून माता-भगिनींच्या चुलीपर्यंत पोहोचली. त्यामुळे राष्ट्रवादीचे ५५ आमदार निवडून आले यामध्ये १२ विरुद्ध शून्यच्या वल्गना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार शरदचंद्रजी पवारांनी निवडून आणले. हि राष्ट्रवादीची खरी ताकद आहे. तुमच्यामागे आ. आशुतोष काळे यांच्यासारखा आदर्श लोकप्रतिनिधी उभा असून कोपरगावला प्रती बारामती करण्यासाठी घराघरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे यांनी केले.

   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि.०६) रोजी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिसंवाद कार्यकर्ता मेळावा श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलतांना प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांना पवार साहेबांनी मोठ केलं ती माणस पवार साहेबांना सोडून चालली होती. तरी देखील पवारांनी त्यांच्या बद्दल चकार शब्द काढला नाही. पवार साहेब एकटे पडले असतांना प्रसार माध्यमांनी १५ ते २० जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील असे चित्र रंगविले होते. त्यावेळी पवार साहेबांनी महाराष्ट्रभर प्रचार सभा घेतल्या. ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता साताऱ्याच्या सभेत धो-धो पावसात देखील भाषण सुरु ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे यश मिळाले आहे ते यश फक्त पवारांमुळेच मिळाले आहे. साईबाबांची सेवा करण्याची संधी कुणालाही मिळत नाही. आ. आशुतोष काळे यांनी जनसामान्यांची सेवा केल्यामुळे त्यांना साईबाबांची सेवा करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. साईबाबांची सेवा करायला मिळाली हे कोपरगावकरांचे भाग्य असून येणाऱ्या नगरपरिषद, सार्वजनिक संस्थानच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून द्या असे आवाहन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कारभारी आगवन, पद्माकांत कुदळे, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, ओ.बी.सी. सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गवळी, युवक जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा आढाव, महिला जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, युवती शहराध्यक्षा सौ. माधवी वाकचौरे, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष रमेश टोरपे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, सर्व सदस्य, तसेच जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सर्व सेलचे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिसंवाद कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतांना माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे समवेत श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे, वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *