पूणतांबे येथे खंडोबाच्या तलवारीची मिरवनुक:- पत्रकार किरण नाईक…

कोपरगाव

पुणतांबे प्रतिनिधी:-
येथे आज खडगधारी खंडोबा मंदीरात चंपाषष्ठी नवरात्र निमीत्त खंडोबाच्या तलवारीची विधीवक पुजा करन्यात आली. तलवारीला गोदास्नान घालुन तिची मिरवनुक काढली गेली

पुणतांब्यात खंडोबाची पुरातन काळातील पंचधातुची तलवार आहे. या तलवारीचा ऊल्लेख पुरानातही केला जातो. खडगधारी खंडोबा मंदीरात ही तलवार भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. आज चंपाषष्ठी नवरात्र निमीत्ताने या तलवारीला गोदावरी नदी काठावर नेण्यात आले. भाविकांच्या ऊपस्तीतीत या तलवारीला पुजारी प्रभाकर शेंडगे. यांच्या हस्ते महाअभिषेक घालुन गंगास्नान धातले गेले. ब्रम्हवृदांच्या वेदधोषात तलवारीची महापुजा करुन नविन वस्त्र पिराधान केले.

गोदाकाठावर असलेल्या खंडोबा मंदीरात खंडेरायांच्या भेटीला ही तलवार नेण्यात आली. वाघे मुरळीच्या वाद्यनिदानात या तलवारीची मिरवनुक काढन्यात आली. यावेळी पिवळा भंडारा ऊधुळुन यळकोटचा जयजयकार केला गेला. श्रावन खरपास. ज्ञानेश्वर खरपास. राजेंद्र मराठे. अजुर्न फल्ले. आदी भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. खडगधारी खंडोबा मंदीरात. ही तलवार घट म्हणुन बसविन्यात आली. भाविकांनी तलवारीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

फोटो ओळी : खंडोबाच्या तलवारीची पुजा करुन, निघालेली मिरवणूक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *