निकालाची परंपरा कायम ठेवा, विकासाचा वारू थांबू देणार नाही पाच वर्षात कालव्यांची ५०० कोटीचे कामे करून घेणार:-आ. आशुतोषदादा काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- २०१६ च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते २०१९ ची विधानसभा निवडणुक व आजतागायत प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर विश्वास दाखविला. त्या विश्वासाला पात्र राहून विकासाचे कोणतेच प्रश्न अनुत्तरीत ठेवणार नाही.आजवरच्या निवडणूक निकालाची परंपरा यापुढेही कायम ठेवा, विकासाचा वारू थांबू देणार नाही असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथे एका कार्यक्रमात केले.

           कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे सन २०२०-२१ केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ३ कोटी ९८ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या रा.मा. - ७ सुरेगाव, कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, धारणगाव, प्रजिमा ८५ रस्ता सुधारणा करणे कामाचे व कोळपेवाडी येथे जिल्हा नियोजन ३०५४ योजनेअंतर्गत ४० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कोळपेवाडी ते रामा ७ पर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सुरेगाव,कोळपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ. पोर्णिमा जगधने होत्या.

              यावेळी उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब, अशोकमामा काळे, माजी संचालक बबनराव कोळपे,प.स. सदस्य अनिल कदम, श्रावण आसने,राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, संभाजीराव काळे उपस्थित होते.

      पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मतदार संघाच्या विकासासाठी मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे सहकार्य मिळत असून गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. चालू वर्षी ५५ कोटी रुपये निधी दुरुस्तीसाठी उपलब्ध झाला असून पुढील वर्षी मिळणाऱ्या १०० कोटीच्या निधीतून गोदावरी कालव्यांची मोठ्या प्रमाणात कामे होणार आहे. येत्या ५ वर्षात गोदावरी कालव्यांची ५०० कोटीची कामे करून घेणार असल्याचे सांगितले. राज्य मार्ग ७ ते कोळगाव थडी स्मशानभूमीपर्यंत रस्त्यासाठी निधी देवू तसेच कोळपेवाडी येथील देवस्थानाला संरक्षक तटबंदीसाठी पुढील काळात निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.

     याप्रसंगी शरदराव पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, सिकंदर पटेल, कचरु कोळपे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राजेंद्र ढोमसे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, कोळगाव थडीच्या सरपंच सौ.मीनल गवळी, मढीचे सरपंच प्रविण निंबाळकर, कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले, धारणगावचे सरपंच नानासाहेब चौधरी, कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे, सुरेगावचे उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर, माहेगाव देशमुखचे उपसरपंच विकास रणसिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे, पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार, गाडे, दिघे आदी मान्यवरांसह सुरेगाव कोळपेवाडी,शहाजापुर, मढी बु. कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, धारणगाव व पंचक्रोशीतील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ- कोळपेवाडी -सुरेगाव येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *