कोपरगांव प्रतिनिधी:-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गड-कोट– किल्ल्यांचा इतिहास जीवंतपणे जाणता राजाच्या माध्यमातुन निर्माण करण्यांत बाबासाहेब पुरंदरे यांचा सिहांचा वाटा असुन त्यांच्या निधनाने निष्ठावंत शिवशाहिरी अखेर हरपली, पृथ्वीतलावरील तळपणांरा तेजस्वी शिवशाहिरीचा सुर्य अस्ताला गेला या शब्दात माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्यावतींने श्रध्दांजली वाहिली. सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही त्यांच्या निधनाबददल शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्रीमंत बळवंत मोरेश्वर उर्फ शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे हे नाशिक येथे तत्कालीन खासदार स्व. वसंतराव पवार यांच्या निवासस्थानी आले असता माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्याशी इतिहासकाळातील मनमोकळया गप्पा करत त्याबाबतची माहिती घेतली. इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीची दुरुस्ती करण्यासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्यामाध्यमांतुन केंद्र व राज्य सरकारबरोबरच पुरातत्व खात्याशी मोठा पाठपुरावा केला होता.
इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मार्गदर्शनातुन त्यांनी तरूणपणांपासुन भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अभ्यासाने मराठी मनाची मरगळ दुर केली. इतिहास कालीन माहितींचे थेट संकलन करून कित्येक ग्रंथ निर्मीती केली. शिवकालीन इतिहास काय आहे, त्याकाळातील युध्दनिती, शस्त्र, गड कोट किल्ल्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थापन, शिवशाहीतील स्मरणांत राहणा-या व्यक्तीरेखा आणि त्यांचे पात्रे आदिंचा मुर्तीमंत अभ्यासु नेतृत्वाचा अस्त झाला असेही ते म्हणाले. राजा शिवछत्रपती पुस्तकाच्या १६ आवृत्त्या त्यांनी प्रसिध्द केल्या होत्या.

फोटो ओळी कोपरगाव:-
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी नाशिक येथील भेटीत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी मनमोकळेपणाने गप्पा केल्या होत्या त्या प्रसंगीचे छायाचित्र.
