

शिवसेनेत मोठ्या संख्येने तरूणांचा प्रवेश… कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील तरूणांचा शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश होत आहे.गेल्या महिण्यात तिसर्यादा शिवसेनेत तरूणांनी प्रवेश घेतला आहे.शिवसेनेत शहारातील विविध प्रभागातील तरुण शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश करत असुन कोपरगाव शहरात शिवसेनेला बहर आला आहे.पक्ष प्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे राज्यातील जनता आनंदी झाली आहे.कोरोनाच्या संकटकाळातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कुटुंबा प्रमाणे संपुर्ण राज्यातील जनतेची सेवा केली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात जनता देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामकाजावर खुष आहे.कोपरगाव शहरात उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शानाखाली शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल याच्या सहकार्याने कोपरगाव शहरात मोठ्या संख्येने तरूणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.हनुमान नगर १०५ भागातील तरूणांनी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, एस.टी.कामगार सेनेचे शहराध्यक्ष भरत मोरे, विशाल झावरे, विक्रांत झावरे,वैभव हलवाई,गौरव गुप्ता,वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख इरफान शेख,राहुल देशपांडे, निलेश पवार, शिवसेना शहर समन्वयक योगेश उशीरे यांच्या प्रमुख उपस्थिती तरूणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याप्रसंगी कलविंदर सिंग दडियाल म्हणाले की,शिवसेना हा तरुणांना एकत्र आणणारा पक्ष आहे.तरुणासांठी व सर्वसामान्यासाठी लढणारा एकमेव पक्ष आहे.राज्यातही शिवसेनेचे जोरदार कामकाज चालु आहे.कोपरगाव कोणतेही मोठी यंत्रणा नसतांना शिवसेना सर्वसामान्यासाठी झटत आहे. त्यामुळे तरणांनी शिवसेनेत यावे.असे प्रतिपादन कलविंदरसिंग दडियाल यांनी केले आहे.त्यानंतर एस.टी.कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे म्हणाले की,गरीबाच्या न्याय हक्कासाठी भांडणारा शिवसेना हा एकच पक्ष असुन आज पर्यत सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवसेनेने केले आहे.गरिब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कणभरही मागे हटणार नाही.कोपरगाव शहरातील विकास कामात शिवसेना नेहमी अग्रेसर राहिली आहे.शहराचा विकास या तरुणांच्या माध्यमातून करु.हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी तरुणांमध्ये निर्माण करुण गाव राज्य देश आणि धर्माचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.दिनेश भालेराव,मुकुंद थोरात ,मच्छीद्र शिरसाट, आकाश खैरनार, विकास खैरनार , संदिप भालेराव, रवि थोरात,गुलाब भालेराव, संजू खैरनार,रवि कोपरे , मनोज शिरसाठ, नवनाथ थोरात , राहुल गायकवाड. , बबलु गायकवाड ,मोहन शिरसाठ , रोहित खैरनार, राजु भालेराव
, रोहीत भालेराव छोटु खैरनार लखन खैरणार, समाधान जाधव, दिपक गायकवाड , शंकर गायकवाड, योगेश शेलार , अनिल गायकवाड, शिवा चंदनशिव आदि तरणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
