एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला कोपरगाव भाजपचा पाठिंबा…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
एस.टी.महामंडळ हे महाराष्ट्र राज्य सरकारकडे विलीनीकरण करावे यासाठी एस टी कर्मचारी बांधवांनी संप पुकारलेला असून या संपाला भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या वतीने कोपरगाव विधानसभा भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
कोरोना सारख्या भयावह संकटात देखील हे कर्मचारी बांधव अहोरात्र सेवा बजावत होते, त्यांना मिळणारा पगार देखील तुटपुंजा आहे,एस.टी.महामंडळ हे सरकारकडे विलीन केल्यास या सर्व बांधवांना दिलासा मिळेल यासाठी सरकारकडे आग्रह धरणे गरजेचे आहे..
या प्रसंगी कोपरगाव भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा गटनेते, रवि पाठक, रवी रोहमारे, कैलास खैरे,माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, सुशांत खैरे,.किरण सुपेकर, गोपी गायकवाड, सोमनाथ म्हस्के, शंकर बिऱ्हाडे,.सचिन चव्हाण, संजय तूपसैंदर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *