
सुरूवातीस वार्षिक पॅकेज रू ४. ५ लाख, धडाकेबाज प्लेसमेंटसाठी संजीवनीचा नावलौकिक…
कोपरगांव प्रतिनिधी:- संगणकिय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काॅग्निझंट सोल्युशनस् या अमेरिकन बहुराष्ट्रीय आघाडीच्या कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधिल अंतिम वर्षातील २५ विद्यार्थ्यांची प्रशिक्षण काळात रू ४. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवुन नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी संजीवनीने आघाडी घेतली आहे. मागील अनेक वर्षांपासून संजीवनीच्या विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहेे, ही बाब संजीवनीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असुन ग्रामिण भागातील शेकडो विद्यार्थी स्वावलंबी होत असल्याचे आनंददायी चित्र निर्माण झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांपी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
काॅग्निझंट सोल्युशनस या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुरज बाळासाहेब भाबड, सोनाली पोपट नाईक, पल्लवी संजय वैष्णव , सुरज रमेश राशिंकर , प्रशांत अशोक डोखळे, भगवान अशोक शिंदे , ऋषिकेश दत्तात्रय कोते, हिरण आयुष पारस, स्नेहल महेंद्र जेजुरकर, कांचन प्रेमचंद सुपे, धनश्री रावसाहेब पवार, गुरूदत्त श्रीपाद कायस्थ, सोनाली कैलास सोनवणे, रिया रमेश माळी, आयुष विनोद शर्मा, प्रशांत विठ्ठल देवकाते, रफिक मुसा सय्यद, प्रतिक्षा रविंद्र मोकळ, महेश शिवाजी शिंदे , गणेश रंगनाथ जाधव, मोहिन अस्पर सय्यद, स्नेहल सुदामराव गायकवाड, आकाश अशोक ढसाळ, श्रीकांत विजय रहाणे व वैभव सुधिर मोरे यांचा समावेश आहे.
विध्यार्थ्यांच्या या निवडीबाबत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितिनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी समाधान न्यक्त करून सर्वांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्प्लेसमेंटच्या टीमचेही अभिनंदन कले.
