सोनूची दानत तो आला ,त्याने पाहिले अन् त्याने जिंकले !!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरीतील गोरगरीब कुटूंबाच्या चेहर्यावर कधी नव्हे ते सुखाचे हास्य उमलले.”भगवान देता हैतो छप्पर फाडके ” अशी त्यांची परीस्थिती झाली.जिथे दोन वेळा खाण्याचे वांदे,तिथे शिक्षणाची काय गत! कोरोना काळात नगरपालिका शिक्षकांनी ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्याचे पवित्र काम सुरू केले खरे ,पण बरेच विद्यार्थी आधूनिक मोबाईल पासून वंचित होते.आर्थिक परिस्थिती आडवी आली.
पण अशा विद्यार्थ्यांसाठी धावून आला एक मसीहा ! हो मसीहाच!
सुप्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेते सोनू सूद यांनी एम.के.आढाव विद्यालय व नगरपालिका प्राथ.शाळेतील शंभर गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना अॅन्ड्राॅईड मोबाईल वाटप केले.
सामाजिक कामाची आवड असलेले सोनू यांनी लाॅकडाऊन काळात परराज्यात जाण्याकरीता परप्रांतीय नागरीकांना मोफत बस सेवा व रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली .ही लोकसेवा करण्याची प्रेरणा त्यांना साईभक्तीतून मिळाली.
ते नियमित शिर्डी येथे साईंच्या दर्शनाला येतात.
हे शक्य झाले ते कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री विनोद राक्षे यांच्या सोनूजींबरोबर असलेल्या मैत्रीमूळे.
श्री विनोद राक्षे यांनी कोपरगावातील गरीब विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्याचे सोनूजींना सांगताच ,त्यांनी मदत करण्याचे मान्य केले .सुमारे दहा लाख किमतीचे मोबाईल विद्यार्थ्यांना दिले.
या कार्यक्रमाची कोणतीही जाहिरात न करता ,शिक्षकांच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थी यादी तयार करण्यात आली .अगदी कमी कालावधीत मोबाईल वाटपाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमामागे कोणतीही राजकीय पाश्वभूमी नव्हती.
या प्रसंगी नगरपालिका प्रशासनाचे विशेष सहकार्य व नगरपालिका शिक्षण मंडाळाची साथ मिळाली. यावेळी नगराध्यक्ष मा.श्री विजयराव वहाडणे ,उपनगराध्यक्ष मा.श्री स्वप्नील निखाडे ,मुख्याधिकारी, मा.श्री प्रशांत सरोदे ,मा.श्री विजयराव आढाव ,श्री बबलू वाणी , संदिप देवकर,उपमुख्याधिकारी श्री सुनिल गोर्डे व अनेक आजी -माजी पदाधिकारी उपस्थित होते .तसेच सोनूची पत्नी सोनाली,मुलगा ईशांत ,निती गोयल हेही आले होते.


सोनूजींच्या हस्ते नगरपालिका प्रशासनाने वृक्षारोपण करून माझी वसुंधरा मित्र अभियान राबविले .

तसेच कोपरगाव नगरपालिका प्रशासनातले कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र देण्यात आली .
याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले .


कु.तृप्ती विलास माळी या मुलीने सोनूचे काढलेले हुबेहूब पेन्सिल स्केच देऊन शाबासकीची थाप मिळवली .
@ सोनूचे कोपरगावशी नाते @
वीस वर्षापूर्वी सोनूचा इंजिनिअरींगला कोपरगाव ला निवड झाली .परंतू येताना नागपूरला इंजिनिअरींगला प्रवेश घेतला .ती हुकलेली कोपरगावची भेट साईंच्या पायी नियमित येताना श्री विनोद राक्षे यांनी दृढ केली .श्री विनोद राक्षे यांच्या बंधूंचे निधन झालेले असताना देखील हा कार्यक्रम रद्द होऊ नये म्हणून त्यांनी ही गोष्ट सोनूजींना समजू दिली नाही .आपले दुःख बाजूला ठेवून गरीब विद्यार्थ्यांकरीता हा मनाचा खूप मोठेपणा दाखवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नगरपालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी व नगरपालिका शाळेचे सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले .
“समाजात खूप लोकांकडे संपत्ती असते ,पण ते दातृत्व असतेच असे नाही.
ती दानत सोनूने दाखवली .
दानशूर सोनू सूद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *