
कोपरगाव प्रतिनिधी : अशवमेध या देशातील शेती औषधे व प्रतिजैविकांचा अग्रगण्य कंपनीने कांदा साठवणुकीसाठीचे आवश्यक असलेले पेटंट फाईल केले असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे कि कांदा हा जगात सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी महत्वाची वस्तू आहे. कांदा उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर येतो व महाराष्ट्र देशात २८.३२ टक्के घेऊन पहिला क्रमांक पटकावतो. असे असून सुद्धा कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याची साठवण हि एक मोठी समस्या बनली आहे.एका जागतिक सर्वे प्रमाणे ४०% कांदा साठवणीची पर्याप्त सोय नसल्यामुळे खराब होतो. ह्या कारणामुळे कांद्याची साठवण व त्याची टिकवण्याची क्षमता हे आधुनिक शेती व्यवसायाचे सर्वात मोठे आवाहन आहे. या आवाहनाने प्रेरित होऊन डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे जागतिक शेती तज्ञ व चेअरमन ,अश्वमेध ग्रुप , यांनी यावर समाधान शोधण्याचा निर्धार केला आणि डेसिकेटर चा जन्म झाला. डेसिकेटर हे जैविक उत्पादन असून कांद्याची साठवणीची आयु वाढवण्यासाठी विशेष रित्या तयार केलेला आणि १५ वर्षाचा संशोधनाचा परिणाम आहे. आम्हाला आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे कि अश्वमेध ने डेसिकेटरचे पेटंट यशस्वी पणे फाईल व पब्लिश केले आहे.
डेसिकेटर चे अनेक फायदे आहेत. १). शंभर टक्के वनस्पतीवर आधारित असल्यामुळे निर्यात व विक्री साठी बाद होणाऱ्या केमिकल रेसिडूवचा प्रश्न कायमचा संपतो. २). फळाची माशीचे अंडीना अटकाव करतो व त्यामुळे कांद्याला किड लागतनाही. ३). मेकानिकल इन्जुरी मुळेहोणारे नुकसान जखमांना कोरडे करून थांबवते. ४). बुरशी व जिवाणू चा संसर्ग थांबवते. ५). खराब कांद्याला कोरड करून त्याची लागणदुसऱ्या कांद्याला होऊ देत नाही. ६). केवळ १ किलो डेसिकेटर १ टन कांद्यासाठी लागते व कांद्याची टिकवण क्षमता ७ ते ८ महिन्यांनी वाढवते. असे हे अश्वमेधचे उत्पादन डेसिकेटर याची ३०० टन वार्षिक विक्री झाली आहे. अश्वमेधचा हा सातत्याने प्रयत्न आहे कि डेसिकेटर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांकडे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. अश्वमेध अशी आशा करते कि, असे युनिक उत्पादन निर्माण करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा भारताच्या निर्धारात आम्ही एक सकारात्मक योगदान असावे अशी अपेक्षा डॉ. वाघचौरे यांनी व्यक्त केली आहे.
