कोेपरगांव शहर बाजार ओटयावरील तळीरामांचा बंदोबस्त करा:- दत्ता काले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहरवासियांसाठी नव्यांने बांधलेल्या बाजारओटयावर मद्यपी, गर्दुले, धुम्रमान करणा-या तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे त्यातुन एैन सणासुदीचे काळात माताभगिनी, लहान मुले, वयोवृध्द यांची सुरक्षीतता धोक्यात येवुन गैरकृत्ये वाढतील तेंव्हा अशा समाजद्रोहीसह तळीरामांचा तातडींने बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केली.
त्यांनी या मागणीचे निवेदन पोलिस स्टेशन व नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देवुन जिल्हाधिका-यंांचेही लक्ष वेधले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, सध्या महिलांवर अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोपरगांव शहरात नव्यांनेच बाजारओटे तयार झाले आहेत त्याठिकाणी दिवसा-रात्री अपरात्री तळीरामांसह गुर्दुल्यांची संख्या वाढत आहे परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, अशा तळीरामांकडुन तसेच गर्दुल्याकडुन अनुचित छेडछाडीचे प्रकार घडु शकतात, सध्या गणपती, नवरात्र दसरा दिवाळीचे सणसुद आलेले आहेत. कोरोनाचे संकट आहे, याही परिस्थितीत पोलिसांचा धाक नसल्यांने गर्दुले तळीराम मोकाट सुटलेले आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आपण सातत्यांने मागणी करत आहोत तेंव्हा कोपरगांव शहरवासियांची सुरक्षीतता धोक्या येवु नये यासाठी पोलिस अधिका-यांस नगरपालिका प्रशासनांने याकडे वेळीच लक्ष देवुन या तळीरामांचा तात्काळ बंदोबस्त करावा, यातुन काही प्रकार उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल तरी या गंभीर बाबीवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी करून त्यांनी मुंबई साकीनाका अबलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशी द्यावी घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे दत्ता काले म्हणांले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *