गो-रज मुहूर्त:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
दिवसाचा तिसरा प्रहर म्हणजे सायंकाळ दिवे लागणीची वेळ तिन्ही सांजा गाई घराकडे पक्षी घरट्यात परतण्याची वेळ या वेळेला गो रज मुहूर्त म्हणतात
गो रज मुहूर्त शुभ मुहूर्त मानला जातो ग्रामीण भागात या वेळेला सवसांज म्हणतात या वेळेला काही गोष्टी करायच्या नसतात दिवे लागण होते लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते शुभ लक्ष्मी घरात येते ती पुढच्या दारातून म्हणून या वेळेला दार उघडले जाते गाईगुर पक्षी आणि कष्ट करून माणसे सुद्धा घराच्या ओढीने परतीच्या प्रवासाला निघतात सायंकाळी गावं घर आणि माणसांची मने प्रसन्न होतात भरून जातात दिवसभराचा थकवा शिणभाग मरगळ झटकून टाकली जाते प्रसन्न ताजेतवाने होऊन नवि ऊमेद निर्माण होते
सायंकाळ जशी माणसाच्या मनात चैतन्य निर्माण करते तशीच कधी कधी हुर हुर लावून जाते वाईटाची चाहूल सुद्धा एखाद्या सायंकाळी मन अस्वस्थ करते म्हणून या वेळेला कातरवेळ म्हणून संबोधले जाते हि वेळ कधी मनाला बेचैन करते सायंकाळ माणसाच्या जीवनातील शेवटच्या क्षणाची निशाणी मानली जाते आयुष्याच्या सायंकाळी सगळे आठवते अस मानतात
असो सायंकाळ ज्याच्या त्याच्या माननयावर मनसतीथीवर अवलंबून असते मनाने सदैव प्रसन्न राहा सायंकाळ प्रसन्न राहील
शेवटी कालाय तस्मै नमः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *