सदाफुली:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
झाड फुलांनी बहरुन यावे , म्हणून प्रतीक्षा करते .. उन्हाची धग न मातीतल्या दगड- धोंड्यांना झेलत , वाट काढत से बहरते , माणसाला बहर तात्काळ हवा असतो . ज्याची थांबायची तयारी नाही , तो साधकच नाही आणि हल्ली ही साधक अवस्था डस्टरने मजकूर पुसावा , तशी पुसण्याचाच प्रयत्न होत आहे . गुरुने परवानगी दिल्याशिवाय शिष्य जाहीर मैफली करीत नसत . गुरुला हे माहीत असे . अवेळी पैसाहाती आला , अकाली प्रसिध्दी मिळाली की शिष्याचा संपूर्ण विकास होणार नाही . शिष्यही गुरुच्या शब्दाबाहेर नसत . आता ‘ क्लासला अॅडमिशन घेतानाच विशिष्ट कार्यक्रमात नाचण्याची व गाण्याची संधी मिळायला हवी , ही अटच पालक घालतात . मग बक्षीसपात्र शिष्य बैताल जातो . कुंडीतले रोप लवकर बहरते … पण तपोवनातल्या विराट वृक्षासारखी सावली देण्याचे सामर्थ्य सदाफूलीत नसतं … जमाना सदाफुलीचा आहे.
हो … ना …

सुलेखन – गोरेसर:-
9850 613 612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *