
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल्याला कुणीतरी मार्गदर्शन करण्यासाठी येईल आणि मग आपण योग्य दिशेने जाऊ.अशी अपेक्षा बाळगण्याचा काळ आता संपलाय । जो तो आपल्यात मस्त आहे .. राज्यकर्ते त्यांच्या राजकारणात दंग आहेत .. शिक्षक आपल्याच चिंतेत … कलावंत आपल्या कलानिर्मितीत दंग आहेत , प्रसार – माध्यमे नवी नवी खुळ निर्माण करण्यात व्यग्र आहेत .. समूहाचा अनुमय करणारे , जबरदस्त लोकेषणा असणारे वक्त मनोरंजनाचे डमरू वाजवणारे मदारी झाले आहेत … मग सांगा … ‘ कुणीतरी येऊन .. बाबारे.हे असं नको … तसंकर असं सांगायला या भोवतालच्या विकारवश कोंडीत सापडलेल्या सामान्यांना कुठे वेळ आहे ? मग तुम्हीच ठरवा..!
