श्री जुनीगंगा देवी पुस्तकाचे संत रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते प्रकाशन..


कोपरगांव प्रतिनिधी (बेट):- जेऊरकुंभारी येथील प्रसिद्ध श्री जुनीगंगा देवी मंदिराची माहिती पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते घटस्थापना दिनी संपन्न झाले.
या प्रसंगी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज, श्री जुनीगंगा जगदंबा देवी मंदिरचे अध्यक्ष विलास नाईकवाडे, संपादक सुशांत घोडके, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे संचालक प्रसाद कातकडे, दिलीप नाईकवाडे, अमोल नाईकवाडे, सौ. मंगल नाईकवाडे, सौ.सुनिता नाईकवाडे, सौ. वैशाली नाईकवाडे, सौ.स्वाती नाईकवाडे, सौ. मनिषा नाईकवाडे, सौ. प्रतिभा नाईकवाडे, कृष्णा प्रिंटर्सचे मनोज शिंदे, सतिष आव्हाड, विकास आढाव, अॅड. वसंतराव कपिले यांचेसह श्री जुनीगंगा जगदंबा देवीचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी संत रमेशगिरीजी महाराज म्हणाले, गोदातीर इतिहासचे माध्यमातून श्री जुनीगंगा देवीची महती उजेडात आणणारी ही पुस्तिका वाचनीय आणि संग्रही ठेवा आहे. जुनीगंगा देवीचे महत्व मोठे आहे. संत जनार्दन स्वामी महाराज यांनी येथील देवीचे सेवेकरी यांना सेवेचा मार्ग घालून दिला आहे.
गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळाचे माध्यमातून संपादक सुशांत घोडके यांनी श्री जुनीगंगा जगदंबा देवीची पौराणिक, अख्यायिका आणि ऐतिहासिक माहिती संकलन करुन पुस्तकात समाविष्ट केली आहे. तसेच महिशासूर मर्दिनी स्तोत्रम्, कुंकुमार्चान (माहिती व १००० मंत्र), आरती, आईच्या ओव्या, जोगवा समावेश आहे. या पुस्तक छपाईसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे संचालक प्रसाद कातकडे आणि कातकडे परिवाराचे सहकार्य लाभले आहे.
पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महती असलेल्या गोदातीरावरील बेट कोपरगांव या स्थानाला विशेष महत्त्व आहे. पुराणकाळात देव-दानव यांच्यातील युध्दात समेट घडविण्यासाठी देवी प्रकट झाली. ही वार्ता गुरु शुक्राचार्य यांना समजताच ते देवीच्या भेटीसाठी गावाबाहेर आले. ते स्थान म्हणजे जुनीगंगा देवी आहे. अशी आख्यायिका आहे. अशी अनेक माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
श्री जुनीगंगा देवीची माहिती, स्तोत्र आणि आरती एकत्र समाविष्ट असलेल्या पुस्तक निर्मितीबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
