Uncategorized

आधुनिक शेतीत व्यवस्थापनातूनच दर्जेदार उत्पादन शक्य :- डॉ. पोपटराव खंडागळे…

टेके पाटील ट्रस्टच्यावतीने रब्बी हंगाम शेती कार्यशाळा उत्साहात…
कोपरगाव प्रतिनिधी :- “हवामान बदल आणि तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ऊस पीक वाचवण्यासाठी उसाच्या दोन्ही बाजूंना ‘रांगोळी पद्धतीने’ ताग किंवा ढेंच्याची पेरणी करावी. ४५ ते ५० दिवसांनंतर ते पीक शेतातच आच्छादल्यास (मल्चिंग) जमिनीतील ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होते आणि जमिनीला सेंद्रिय खताचा मोठा पुरवठा होतो, त्याचबरोबर आधुनिक शेती, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि विविध पिकांची लागवड या बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या सर्वांच्या उत्तम व्यवस्थापनातूनच दर्जेदार उत्पादन शक्य असल्याचे निफाड कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पोपटराव खंडागळे यांनी दिला.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.१०) हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्व.राहुल टेके यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे होते.
यावेळी पोहेगाव मंडळाचे मंडळ अधिकारी सुनील घारकर यांनी राज्य व केंद्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी केले.
डॉ. खंडागळे म्हणाले, कोणत्याही प्रकारची खते जमिनीत वरच्यावर न टाकता ती जमिनीत रितवून आणि मुरवून, मातीत मिसळून दिली पाहिजेत. कांद्याचे उत्पादन घेत असताना पहिल्या तीन पाण्यामध्ये औषधांची फवारणी करावी आणि शेवटी निवोशी किंवा कतार वापरून शेवटची फवारणी करावी. कांदा काढणी करताना शेंडी मोठी ठेवल्यास त्याची साठवणूक क्षमता वाढते.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे, कृषी अधिकारी मनीषा पांगरेकर, मधुकर टेके, अनिल गोरे, अण्णासाहेब टेके, नानासाहेब गाडगे, विशाल टेके, अक्षय टेके, रामेश्वर ठोंबरे, वाल्मीक गोर्डे, तान्हाजी थोरमीसे, नंदू जाधव, बाळासाहेब काथे, साहेबराव घुमरे,अशोक मलिक, जालिंदर शिरसाठ,ऋषिकेश मलिक, आकाश निळे, बाबासाहेब थोरमिसे, विलास गोंडे, शुभम गाडगे, सखाहरी सोळशे, खंडू वानखेडे, कल्याण टेके, गणेश काथे, संजय थोरात, साईनाथ मोरे, उत्तम वाकचौरे, जितेंद्र टेके, सुरज टेके, स्वप्निल टेके, अनिरुद्ध जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्यावतीने चहा व अल्पोपाराची व्यवस्था करण्यात आली होती.
या मार्गदर्शन शिबिराचा परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला असून, शेतीविषयक तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हभप विनायक महाराज टेके यांनी तर गोरख टेके यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *