Uncategorized

दुष्काळाच्या झळा तीव्र,आ. विवेक कोल्हेंनी मांडले शेतकऱ्यांचे मदतीचे प्रश्न, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटलांनी दिल्या उपाययोजनांच्या सूचना…

दुष्काळग्रस्त कोपरगावसाठी आ. विवेक कोल्हेंच्या ठोस मागण्या,पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका दुष्काळ टंचाई आढावा बैठक जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीसाठी आमदार विवेक कोल्हे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकून शेतकरी हिताचे प्रश्न निदर्शनास आणून दिले त्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत थकीत पाणी पट्टीसह जलजीवन मिशन आणि प्रलंबित कामांना जिल्हा नियोजन अंतर्गत निधीची पूर्तता ग्वाही दिली.

यावेळी बोलताना आ. विवेक कोल्हे म्हणाले येत्या काळात पशुधन चाऱ्याची गरज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रलंबित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी निधी गरजेचा आहे.प्रश्नांच्या भडिमारावरून तीव्रता किती आहे हे या बैठकीत दिसते आहे.सध्या पिक कापणी प्रयोग करताना असलेल्या नियम अटी सुधारणा करून करता येईल. खरिप अंतर्गत १६ आणि रब्बी अंतर्गत ६३ गावे येतात त्यासाठी आवर्तन निश्चित केलेल्या तारखे प्रमाणे मिळावे त्यातून नियोजन करणे सोयीस्कर होईल.
पोटखराबा क्षेत्र वेश सोयगाव धोंडेवाडी यासह अनेक गावातील क्षेत्रांना मदत मिळावी.दुग्ध व्यवसायासाठी मोफत बियाणे देण्यात यावे आम्हीही काही प्रमाणात केले आहे.उजवा आणि डावा कालव्याचे पाणी वाद मिटवण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे. पाणी चाऱ्या दुरुस्तीसाठी दीडशे कोटींचा निधी मंजूर आहे मात्र त्याची कामे लवकर व्हावी.पाणी पट्टीवरील लोकल सेस माफ करावा.दहा बारा वर्षापासून काही पाणी पट्टी थकीत आहे त्या माफ कराव्या.विजेचा प्रश्न अतिशय मोठा आहे. डी पी डी सी मध्ये प्रश्न सोडवण्यासाठी निधी उपलब्ध केला त्याबद्दल आभार मानून तातडींचे कामे पूर्ण करण्यासाठी सांगितले.

फळबाग सोसायट्या कर्जमाफीमध्ये बसल्या पाहिजे यासाठी मदत होईल.रोजगाराचा प्रश्न उद्भवणार आहे त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबवावी.मंडळ निहाय हवामान केंद्र आहे मात्र गाव निहाय बसल्यास अधिक फायदा शेतकऱ्यांना होईल.निळवंडे लाभ क्षेत्रातील गावे जिरायत धरले जाते मात्र आता पाणी उपलब्ध होते त्यामुळे त्या भागाला बागायत धरले तर अधिकची रक्कम मिळेल.शेती महामंडळाच्या जागा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची देखील नोंद घेऊन न्याय द्यावा.
तालुक्यातील केटी वेअर ५० टक्के भरलेले आहे त्याच्या फळ्या काढल्या तर पाणी टंचाई येईल त्यामुळे आहे त्या परिस्थितीत फळ्या न काढता उर्वरित तळे भरून द्यावे त्यातून आगामी काळातील पाण्याचा तुटवडा कमी जाणवेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.निळवंडे धरणातुन कोपरगाव तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, हरिसन ब्रँच समस्या यावर आ.विवेक कोल्हे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.
कर्जमाफी प्रमाणे ७ नंबर पाणी योजनेच्या थकीत पाणी पट्टी माफी करावी,पंचनामे तात्काळ पूर्ण करावे, इ पिक पाहणी,जलजीवन मिशन, एम. एस. इ.बी.,महसूल,पशुधनाचे प्रश्न, विविध गावातील योजनांच्या जीवन मिशनच्या पाण्याच्या टाक्या कार्यान्वित नाहीत यावर लक्ष वेधले असता ना. विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष पराग संधान यांनी नगरपालिका पाणी पट्टी थकीत आहे यावर लक्ष वेधले त्यावर त्या फक्त मूळ रक्कम भरावे दंड आणि व्याज माफ करण्याचे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.बिबट्याच्या प्रश्नावर बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या.

आ.आशुतोष काळे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे,नगराध्यक्ष पराग संधान,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,नितीन दिनकर,कोल्हे कारखाना व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर परजणे,यासह प्रांताधिकारी धनंजय बांगर,कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, सुधाकर बोऱ्हाळे, तहसीलदार महेश सावंत यासह विविध संस्थांचे प्रमुख,प्रशासनाचे विविध विभागांचे प्रमुख अधिकारी,आजी माजी नगरसेवक,कोल्हे कारखाना सर्व संचालक,विविध गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *