Uncategorized

लोकनेते मा. खासदार भिमराव (नाना) बडदे यांच्या ७९ व्या जयंती सप्ताहानिमित्त वृक्षारोपण व पालकत्व अभियानाचा शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-
लोकनेते, धर्मयोद्धा माजी खासदार भिमराव (नाना) बडदे यांच्या ७९ व्या जयंती सप्ताहानिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण आणि पालकत्व अभियानाचा शुभारंभ रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक, कोपरगांव येथे होणार आहे.अशी माहिती ज्येष्ठ मार्गदर्शिका नानीसाहेब बडदे यांनी दिली आहे.
याप्रसंगी कोपरगांव शहरातील शालेय विद्यार्थ्यांना ५०० देशी वृक्ष रोपांचे मोफत वितरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन हा यंदाच्या जयंती सप्ताहाचा मुख्य उद्देश असून १ ऑगस्ट २०२६ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वृक्षारोपण, रोपांचे वाटप आणि पर्यावरण जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, असे अभियान प्रमुख व पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांनी सांगितले.

“नाना बडदे यांनी आयुष्यभर संघर्ष, समाजसेवा आणि शेतक-यांसाठी लढा दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हा उपक्रम लोकनेते मा. खासदार भिमराव (नाना) बडदे 79 वी जयंती सप्ताह समिती आणि धर्मयोद्धा माजी खासदार अॅड. स्व. भिमराव (नाना) बडदे स्मृति प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत, शाखा कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमास सर्व राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *