Uncategorized

विद्यार्थ्यांसाठी मला बस अडवावी लागेल
आमदार आशुतोष काळेंचा एस.टी.प्रशासनाला सूचक ईशारा…

कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर – राज्यात शाळा महाविद्यालये सुरु झाले असून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी बस ने प्रवास करत असतात. लांब पल्ल्याच्या बस छोट्या बस थांब्यावर थांबत नाहीत. बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना तासंतास बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसमध्ये जागा असल्यास विद्यार्थ्यांना बसमध्ये घ्यावे. बसमध्ये जागा असून देखील विद्यार्थ्यांना डावलणे योग्य नसून बस प्रवासाचा मासिक पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी बस हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे बसमध्ये जागा असूनही विद्यार्थ्यांना न घेता बस मोकळी जात असल्यास विद्यार्थ्यांसाठी मला ती बस अडवावी लागेल असा सूचक ईशारा आमदार आशुतोष काळे यांनी एस.टी. प्रशासनाला दिला आहे.
आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगारात नव्याने दाखल झालेल्या ०५ नवीन राजमाता जिजाऊ बसचे लोकार्पण सोमवार (दि.१५) रोजी त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, कोपरगाव बस आगारात बस संख्या कमी असल्यामुळे काही मार्गावरील बसच्या फेऱ्या अनियमित झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणी येत होत्या. त्याबाबत परिवहन विभागाकडे केलेल्या पाठ्पूराव्यातून राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. श्रीम.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री ना.प्रतापजी सरनाईक, पालकमंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून यापूर्वी नवीन १० लालपरी बस व आता ०५ नवीन राजमाता जिजाऊ बस अशा एकूण १५ नवीन बस सव्वा वर्षात कोपरगाव बस आगाराला प्रवाशांच्या सेवेसाठी मिळविल्या आहेत.त्यामुळे निश्चितच या नवीन बसेसमुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येण्यास मोठी मदत होणार असली तरी अजून बस मिळविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी संगितले. तसेच कोपरगाव आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक बसची देखील मागणी केलेली असून त्या बस देखील प्रवाशांच्या सवेत लवकरच दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डेपो मॅनेजर अमोल बनकर, वाहतूक निरीक्षक अमित हांपे, आगार लेखाकार मिलिंद कोपरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, विजय त्रिभुवन, इम्तियाज अत्तार, वाल्मिक लहिरे, शैलेश साबळे, सोमेश आढाव, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक विरेन बोरावके, रमेश गवळी, बाळासाहेब आढाव, अजीज शेख, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सचिन ठोळे, नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, शुभम काळे, मनोज नरोडे, धनंजय कहार, सागर फडे, मुकुंद भूतडा, नितेश बोरुडे, सागर आहेर, डॉ.अजय गर्जे, डॉ. आतिश काळे, संतोष मरसाळे, अशोक आव्हाटे, सचिन परदेशी, मुकुंद इंगळे, जावेद शेख, भाऊसाहेब भाबड, चंद्रकांत धोत्रे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र खैरणार, संतोष दळवी, विकी चांदर, तन्मय साबळे, वैभव कानडे, हारुन शेख, फैय्याज, मयुरेश शिंदे, मयुर राऊत, बाबासाहेबजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *