


कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.13/01/2025 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत आगामी मकरसंक्राती सणाचे अनुषंगाने मोठया प्रमाणात पतंग उडविण्यात येतात.पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरण्यात येतो,नायलॉन मांजा वापरण्यास प्रतिबंध होवुन नायलॉन बाबत जनजागृती व्हावी या करीता मुख्य बाजारपेठ येथील पतंग खरेदी विक्री दुकाणदार यांना मांजा खरेदी विक्रि करु नये अथवा जवळ बाळगु नये या बाबत जनजागृती करण्यात आली





तसेच के. जे. सोमय्या कनिष्ठ विद्यालय कोपरगाव येथील विद्यार्थी व विद्यार्थिना यांना मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना मांजा चा वापर करू नये बाबत जनजागृती करण्यात आली तसेच पोलीस स्टेशनच्या व्हॉटसॲप / सोशल मिडीयाचे माध्यमातुन नॉयलॉन मांजा वापर,विक्री व खरेदी होवु नये या करीता जनजागृती करण्यात येत आहे.त्याप्रमाणे साधे वेशातील अंमलदार यांचेकडुन मांजा विक्री दुकाणांची वेळो वेळी तपासणी करण्यात येत आहे.
मा.सविनय सादर
पोलीस निरीक्षक
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन
