


कोपरगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत इस्रो सहलीसाठी घेतलेल्या परीक्षेत जि. प. प्राथ. शाळा धोत्रे (मराठी ) कोपरगाव या शाळेने उत्तुंग भरारी घेतली आहे. या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड या सहलीसाठी झाली आहे.
इयत्ता सहावीच्या गटात फरीद नईम शेख 164 गुण प्रथम क्रमांक.
इयत्ता सातवी व आठवीच्या गटात अथर्व कृष्णा जाधव 170 गुण प्रथम क्रमांक. तसेच इयत्ता सहावीच्या गटात मयुरी विलास माळवदे या विद्यार्थिनीने 142 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना श्री निलेश थोरात सरांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी जिल्ह्यातील हुशार विद्यार्थ्यांची सहल विमानाने विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी आयोजित केली आहे
या यशाबद्दल मा.शेख मॅडम गटशिक्षणाधिकारी कोपरगाव केंद्रप्रमुख भांड साहेब अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
