कोपरगाव तालुक्यातील कोरोना केअर सेंटरची उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे कडून पहाणी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित व्यक्तीवर प्रथमोपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरची पहाणी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केली.
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा तपोभूमी,कोपरगाव,एस.एस.जी.एम.महाविद्यालय कोपरगाव आणि आत्मा मालिका इंग्लिश मेडिअम स्कूल येथे उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरला भेट देवून आढावा घेतला.
या प्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे सह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *