लायन्स क्लब ऑफ कोपरगाव तर्फे नेत्र विकार तपासणी शिबिर संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रवंदा या ठिकाणी नेत्रविकार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मोतीबिंदू, तिरळेपणा, डोळ्यावरील पडदा निर्मूलन, डोळ्याचे नंबर तपासणे अशा विविध तपासण्या करण्यात आल्या . सदर कार्यक्रम हा राम मंदिर रवंदा या ठिकाणी पार पडला. या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये चष्मे देखील उपलब्ध करून देण्यात आले होते . या शिबिरामध्ये परिसरातील 300 पेक्षा जास्त लोकांची डोळ्याची तपासणी करण्यात आली त्यामध्ये सुमारे 35 रुग्ण हे मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले , 10 रुग्णांची बुबूळा वरील पडदा निर्मूलन , 5 तिरळेपणा आहे असे आढळून आले या सर्व या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया अत्यल्प दरामध्ये आनंद ऋषीची नेत्रालय अहमदनगर या ठिकाणी करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व रुग्णांचा जाणा-येण्याचा जेवणाचा आणि औषधांचा खर्च हा पूर्णपणे मोफत असणार आहे.


सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे सदस्य लायन डॉक्टर नितीन झंवर, डॉक्टर सौ.वर्षा झंवर यांचे मोठे सहकार्य लाभले.
सदर शिबिरास लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष लायन सुमित भट्टड, लायन प्रसाद भास्कर, लायन अभिनंदन शिंगी, लायन संदीप राशिनकर, लायन राहुल नाईक, लायन अक्षय गिरमे लायन डॉक्टर विलास आचारी
तसेच लिनेस क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष
सौ रोशनी भट्टड,
सौ. भावना गवांदे, सौ.अंजली थोरे, सौ. नेहा बत्रा , सौ. अंजू पंजाबी,
सौ. शीला राशिनकर.
तसेच श्री बाळासाहेब कदम, संचालक कोसाका आणि श्री सुभाष दवंगे माजी तालुका अध्यक्ष बीजेपी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *