नगरपालिकेने शहराला स्वच्छ व पूर्वीप्रमाणे ४ दिवसाआड पाणी पुरवठा पूर्ववत करावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

Uncategorized

नगरपालिकेने शहराला स्वच्छ व पूर्वीप्रमाणे ४ दिवसाआड पाणी पुरवठा पूर्ववत करावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कॅनलला पाणी चालू असून नगरपालिकेने शहराला आठवड्यातून एक दिवस होणारा पाणीपुरवठा हा पूर्ववत चार दिवसाआड तात्काळ करावा. २८ नोव्हेंबरला नगरपालिकेने कॅनलचे काम करावयाचे असल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी उशिरा मिळणार असल्याचे पत्र आल्याचे सांगून , नगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा केला.
गेल्या सात महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस पाणी येत आहे. डिसेंबर ,जानेवारी ,फेब्रुवारी ,मार्च ,एप्रिल, मे आणि आता जून महिना संपत आला आहे. कॅनल दुरुस्तीचे काम हे केव्हाच झाले.
पाटबंधारे विभागाने पिण्यासाठी सध्या कॅनल सोडलेला आहे, तरी नगरपालिकेने कॅनल सुरू झाल्यानंतर व कॅनल बंद होत असताना नगरपालिकेचा मंजूर पाणी कोठा हा शिल्लक राहतो तो लक्ष देऊन भरून घ्यावे व नागरिकांना या त्रासा पासून दिलासा द्यावा.


सदर पाणी देत असताना गेल्या दोन महिन्यापासून खूप घान दुर्गंधीयुक्त गाळ असणारे अस्वच्छ पाणी नागरिकांना नगरपालिका देत आहे. खरे तर फिल्टरेशन प्लांटची काम झालेले आहे असे असताना देखील नगरपालिका स्वच्छ पाणी नागरिकांना का देऊ शकत नाही याचा विचार जनतेने करायला हवा. दुसरीकडे येवला नगरपालिकेने तळे भरल्याने पाण्याचे दिवस कमी केले. श्रीरामपूर शहराला व संगमनेर शहराला आजही रोज पाणी मिळते , रहाता शिर्डीलाही अडचण नाही. तरी नगरपालिका प्रशासनाने साठवण तळ्याकडे भरताना विशेष लक्ष द्यावे व फिल्टरेशन प्लांट कडे लक्ष दिले तर निश्चित चांगले पाणी जनतेला देता येईल. गेल्या सहा-सात महिन्यांपासून जे कॅनॉलचे दुरुस्ती कामाच्या नावाखाली शहराला होणारा पाणीपुरवठा आठवड्यातून एकदा केला होता , तो तात्काळ नगरपालिकेने चार दिवसाआड प्रमाणे पुरवत करून स्वच्छ पाणी नागरिकांना देण्यासाठी लक्ष द्यावे आणि पावसाळा अगदी आता तोंडावर आहे . पाण्याची धरण साठ्यात मुबलकता वाढणार आहे . त्यामुळे उन्हाळ्यात लग्नसराईमध्ये मुलांच्या सुट्टीच्या काळात नगरपालिकांनी अस्वच्छ व आठवड्यातून एकदा पाणी दिले , त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करायला लावला विशेष करून महिला भगिनींचे खूप हाल या काळात झाले. तरी पाणी पुरवठा ४ दिवसाआड पूर्ववत करावे .ही जनतेची प्रशासनाला विनंती…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *