जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- दिवसेंदिवस मनुष्याचे जीवन अत्यंत धावपळीचे होत असून त्यातून ताण वाढून आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे .त्यासाठी केंद्र सरकारने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता देऊन प्रत्येकाने योग करत त्यातून मनाचा ताण हलका करावा ही शिकवण जगात रुजवली. त्याची अंमलबजावणी बुधवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती येथे करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे यांनी योग दिनाचे महत्त्व विशद केली. यावेळी शाळेतील सर्व मुलांनी शिक्षक व पालकांनी योग केले.योगामुळे माणसाचे मन प्रसन्न होते आणि शरीर तंदुरुस्त राहते म्हणून योग नियमित आपल्या जीवनामध्ये करावा असे संदेश देण्यात आला. योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *