राष्ट्रसंत जनार्धन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचेमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्पंदन 2023 मध्ये घवघवीत यश…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (नाशिक )दरवर्षी प्रमाणे आयोजित ‘स्पंदन 2023 आयोजित केलेले आहे. या अंतर्गत अनेक कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी
मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. विद्यापीठाने आयोजित केलेल्या ललित कला ही स्पर्धा नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये आयोजित केली होती. ललित कलामधील चिकणमाती कला या स्पर्धेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या रोहित गोविंद दळवी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळवत विद्यालयाचे नाव रोशन केले.रोहित गोविंद दळवी याला सन्मानपत्र, ट्रॉफी, व मेडल देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी मंचावर महाराष्ट्र विज्ञान विदयापीठाचे कुलगुरू डॉ.माधुरी कानिटकर पूर्व कुलगुरू डॉ मिलिंद निकम कुलसचिव डॉ.राजेंद्र बंगाळ,विद्यार्थी कल्याण संचालक मनोजकुमार मोरे,गोखले नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ.ज्योती ठाकुर इत्यादी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजचे सौरभ मुंगसे चित्रकला स्पर्धा, रोहित पगारे फोटोग्रॉफी (स्थल छायाचित्रकारी) या विदयार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांनाही प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना आरजेएस संस्थेचे चेअरमन चांगदेव कातकडे संस्थेचे सदस्य विजय कडु, संस्थेचे सेक्रेटरी प्रसाद कातकडे संस्थेचे सदस्य दिपक कोटमे महाविद्यालयाचे प्राचार्य इरशाद अली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *